गावठी कट्टा व जीवंत काडतुसे जवळ बाळगून फिरणार्यास करण्यात आली अटक
पनवेल : वार्ताहर
खारघर वसाहतीमधील एका गार्डनमध्ये गावठी कट्टा व जीवंत काडतुसे घेवून वावरणार्या एका इसमास गस्त घालणार्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
खारघर वसाहतीतील सेक्टर 6 येथील बगीचामध्ये विशालसिंग चौहान (26) हा स्वतः जवळ गावठी कट्टा व दोन जीवंत काडतुसे बाळगून फिरत असताना त्या ठिकाणी गस्त घालीत असलेल्या पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याला थांबवून त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याजवळ वरील वर्णनाची हत्यारे सापडली. याबाबत तो समाधानकारक उत्तरे देवू न शकल्याने त्याच्याविरुद्ध खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.