श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने  जसविंदर बदेशा यांना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत   
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने

 जसविंदर बदेशा यांना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत   


पनवेल(प्रतिनिधी) परदेशात होणाऱ्या पॉवर लिफ्टिंग स्पर्धेकरिता निवड झालेले कळंबोली येथील जसविंदर बदेशा यांना श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने २५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली असून सदरच्या मदतीचा धनादेश मंडळाचे सचिव व महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 


        ग्लोबल पॉवर लिफ्टिंग फेडरेशनच्यावतीने ७ मार्च रोजी युक्रेनमध्ये युरो अशियन पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघात जसविंदर बदेशा यांची निवड झाली आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने त्यांनी या संदर्भात मदत मागितली होती. त्यानुसार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल या सेवाभावी संस्थेच्या वतीने जसविंदर यांना आर्थिक मदत करण्यात आली. त्यांना धनादेश देताना भाजपचे युवा नेते हैप्पी सिंग, कार्यालयीन व्यवस्थापक अनिल कोळी उपस्थित होते.